
ग्रॅव्हीटी पाणी योजनेच्या प्रशासकीय मान्यतेपूर्वी भरावे लागणार १६ कोटी
गेली कित्येक वर्षे रखडलेल्या ग्रॅव्हीटी नळपाणी योजनेला राज्य सरकारकडून नुकतीच तांत्रिक मंजुरी मिळली. परंतु प्रशासकीय मान्यतेपूर्वी चिपणूण नगर पालिकेला तब्बल १६ कोटी रुपये शासन दरबारी भरावे लागणार आहेत. या नंतरच प्रशासकीय मंजुरी मिळून योजनेचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आता चिपळूण नगर पालिका प्रशासनासमोर निधी उभा करण्याचे आव्हान असून त्यावर योजनेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.www.konkantoday.com