चिपळूण पालिकेचा १४८ वा स्थापना दिवस १६ डिसेंबर रोजी साजरा होणार.
चिपळूण नगर परिषद सोमवार दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी १४८ वा स्थापना दिवस साजरा करीत आहे. या निमित्ताने नगर पालिका कार्यालयात सकाळी दहा वाजता छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रम व अल्पोपहार असा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली.यावेळी काही जुनी मंडळी पालिकेविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा देतील.
तसेच स्थापना दिनानिमित्त नागरिकांसाठी एमईएस आयुर्वे महाविद्यालयाच्यावतीने प्रकृती परीक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचाही नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगर पालिकेच्यावतीने मुख्याधिकारी विशाल भोसले, सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.www.konkantoday.com