माजी मंत्री भास्कर जाधव शिवबंधनात अडकले
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणातील नेते भास्कर जाधव यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांनी जाधवांच्या हाती शिवबंधन बांधले आहे. जाधव म्हणाले, मी मुळचा शिवसैनिक आहे.या वेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम,खासदार संजय राऊत,म्हाडा अध्यक्ष उदय सामंत,आमदार निलम गोरे उपस्थित होते.