रत्नागिरी जवळील हातखंबा येथे टँकरच्या धडकेत निवळीतील तरुणाचा मृत्यू.

मुंबई- गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील हातखंबा येथील दर्याजवळ पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शिशिर रावणंग यांचा जागीच मृत्यू झाला.

त्याचे अपघाती निधन रत्नागिरीकराना चटका लावून गेले. शुक्रवारी दि. १३ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला . टँकर चालक सोनु महतो (रा. झारखंड) यालापोलिसांनी अटक केली आहे. शिशिर शांताराम रावणंग (३६, निवळी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकीला धडक देणारा टँकर हा मुंबई गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या एका कंपनीचा होता. शिशिर यांच्या दुचाकीला पाठीमागुन भरधाव वेगात आलेल्या टँकर क्र. एमएच ०५ बीए ३६७७) ने जोरदार धडक दिली. त्या धडकेत शिशिर दुचाकीवरून फेकला गेला. त्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला. या अपघातानंतर टँकर चालक तत्काळ घटनास्थळावरुन पसार झाला. अपघात पाहताच तेथे असणाऱ्या आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेतली. गंभीर जखमी होऊन निपचित पडलेल्या शिशिर यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे दाखल करताच वैदाकिय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button