
खोपोली-पाली महामार्ग महामार्गावर दुचाकी व स्कूल बस अपघातात तीन जण ठार, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल.
खोपोली-पाली महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याची प्रचिती पुन्हा आली. स्कूल बस आणि दुचाकी यांची टक्कर होऊन दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पाली-खोपोली मार्गावरील कानसळ गावाजवळील नेव्ही कॉलेजसमोर झाला.श्रीराज एज्युकेशन सेंटरची स्कूल बस घोटावडे येथून विद्यार्थ्यांना पालीकडे घेऊन जात होती. त्याचवेळी पालीकडून खोपोलीच्या दिशेने वेगाने आलेली दुचाकी स्कूल बसला धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकीवरील तिघांचाही यात जागीच मृत्यू झाला. स्कूल बसच्या पाठीमागून येणाऱ्या कारच्या डॅश कॅमेऱ्यात या अपघाताची थरारक घटना कैद झाली आहे.