मिरज वरून पेट्रोल घेऊन आलेल्या टँकरच्या टायर मधून अचानक मोठ्या प्रमाणावर धूर ,रत्नागिरी शहरातील मोठी दुर्घटना टळली.

रत्नागिरी शहरातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल देण्यासाठी मिरज वरून पेट्रोल भरून आलेल्या टँकरचे टायर मधून मोठ्या प्रमाणावर अचानक धूर येऊन टायर पेटण्याची वेळ आली होती. त्यामुळे मोठा गंभीर प्रसंग उद्भवला होता, मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी प्रसंगवधान राखून हा प्रकार चालकाच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी तात्काळ टँकर थांबवला. हा प्रकार शहरातील भरवस्तीत असलेल्या मारुती मंदिर सर्कलच्या ठिकाणी घडला, ही घटना कळताच रत्नागिरी नगरपरिषद व एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन धूर घेऊन पेटलेल्या टायरची आग विझवली.

मारुती मंदिर सारख्या गजबजलेल्या ठिकाणी काल रात्री नऊ वाजता हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली भर शहरातच हा प्रकार घडल्याने जर दुर्दैवाने पेट्रोल भरलेल्या टँकरला आग लागली असती, तर मोठा गंभीर प्रसंग उद्भवला असता मात्र नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र टायरना कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही ही घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीवर नियंत्रण केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button