सह्याद्रीच्या कुशीत वसलेले कोळकेवाडी धरण भागविणार चिपळूणची तहान.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले कोळकेवाडी धरण चिपळूणची भाग्यरेषा समजली जाते. आता या धरणातून शहरातील नागरिकांची शुद्ध व मुबलक पाण्याची तहान भागवली जाणार आहे. अथक प्रयत्नानंतर तब्बल २० वर्षानी या धरणातून ग्रॅव्हीटी पाणी योजनेचे चिपळूणकरांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. या योजनेचे नाशिक येथील श्रमगाथा ठेकेदार कंपनीला कामाचे आदेश देण्यात आले आहेत.
या कंपनीकडून तसेच नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देखील कामाला सुरूवात करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, २०४६ पर्यंत शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध होईल, अशी रचना या योजनेत करण्यात आली आहे. भविष्यातील लोकसंख्या गृहीत धरून सुमारे ६.०७०८ दशलक्ष घनमीटर इतक्या प्रमाणात या योजनेतून पाणी पुरवठा संपूर्णपणे ग्रॅव्हीटी स्वरूपात केला जाणार असल्याने ही योजना तितकीच फायदेशीर ठरणार आहे.www.konkantoday.com