
कुलस्वामी स्वयंभू श्री रत्नेश्वराचा वार्षिक उत्सवाला अकरा डिसेंबर पासून झाला प्रारंभ विविध कार्यक्रमांचे आयोजन
रत्नागिरी: श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्ट, धामणसें आणि धामणसें ग्रामोत्कर्ष मंडळ,मुंबई यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे कुलस्वामी स्वयंभू श्री रत्नेश्वराचा वार्षिक उत्सव
बुधवार दिनांक ११/१२/२०२४ ते रविवार दिनांक १५/१२/२०२४* पर्यंत साजरा होणार आहे. यानिमित्ताने सकाळी रुद्राभिषेक आणि रात्रौ आरत्या, भोंवत्या व कीर्तन हे कार्यक्रम होतील.
त्याशिवाय पुढील प्रमाणे विशेष कार्यक्रम होतील.
बुधवार दि. ११/१२/२०२४ सकाळी ७.३० वा. ध्वजारोहण आणि ग्रामसंकिर्तन,
गुरूवार दि. १२/१२/२०२४ दिवसा विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा, शुक्रवार, दि. १३/१२/२०२४. दु.२.३० वा. श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टची सर्वसाधारण सभा,
शनिवार, दि. १४/१२/२०२४ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ.
रविवार दि. १५/१२/२०२४ सकाळी -लघु रुद्र अभिषेक,दुपारी येणाऱ्या सर्व भक्तांकरिता महाप्रसाद, रात्रौ – प्रासादिक नाटयप्रयोग *’प्रेमा तुझा रंग कसा*’ तसेच ‘ग्रामदेवतांचा गोंधळ’ कार्यक्रम
मंगळवार दिनांक १७/१२/२०२४रोजी दरवर्षी प्रमाणे होईल.
तरी आपण सर्वांनी उत्सवास अगत्य येऊन श्रींचे दर्शनाचा आणि सुश्राव्य कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम सुरू असून या आपल्या कार्यात आपले योगदान देणे गरजेचे आहे.
याकरिता सामाजिक कार्यकर्ते व गावातील तळमळीने काम करणारे अविनाश सखाराम जोशी उपाध्यक्ष असून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यावर्षीही उत्सव काळामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
तसेच मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आल्याने भाविकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे.ज्यांना आर्थिक मदत कारावयाची आहे.
त्यांनी श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्ट जिर्णोद्धार खाते क्रमांक- 142710110000297व IFSC कोड -BKID0001427 बँक ऑफ इंडिया, नेवरे शाखा आहे. अधिक माहिती साठी श्रीकांत वसंत देसाई अध्यक्ष श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्ट मोबा.9284437624 यांच्याशी संपर्क करावा.