
गुहागर तालुक्यातील हेदवी समुद्रात सोडल्या कृत्रिम भित्तिका
राज्यातील मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी मत्स्य प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय विभागाच्यावतीने प्रधानमंत्री मत्स्य संपदेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पाच सागरी जिल्ह्यांमध्ये १४५ गावांमध्ये कृत्रिम भित्तिका सोडण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला. यामध्ये गुहागर तालुक्यातील हेदवी गावामध्ये ६ मे रोजी कृत्रिम भित्तिका पाखरण कार्यक्रम प्रमुख शास्त्रज्ञ जो. किझाकुडन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पार पडला.महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. भारताच्या मत्स्योत्पादनाच्या केलेल्या अभ्यासामध्ये ६५ ठळक मत्स्य जातींपैकी ३५ मत्स्य जातींचे मत्स्योत्पादन शून्य झाले आहे. मासेमारी मत्स्य व्यवस्थापन व मत्स्य प्रजातींचे संरक्षण करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने कृत्रिम भित्तीकांचे पाखरण कार्यक्रम घेण्यात आला. ही कृत्रिम भित्तिका शास्त्रोक्त अभ्यास करून निर्माण केली आहे. www.konkantoday.com