सिंधुदुर्गात विजेचा धक्का बसून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू
सावंतवाडी माडखोल-खळणेवाडी येथे फुटलेला इन्सुलेटर बदलण्यासाठी खांबावर चढलेला मजूर कामगार विजेचा धक्का लागून खाली पडून गंभीर जखमी झाला.त्याला तातडीने उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; उपचार सुरू असताना दीड तासांतच त्याचा मृत्यू झाला. रूपेश अनंत डांगी (वय ३०, रा. महादेवाचे केरवडे) असे त्याचे नाव आहे. ही दुर्घटना काल सायंकाळी चार वाजता घडली. येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.