लातूर जिल्ह्यातील तळेगावातील ७५ टक्के जमिनीवर वक्फ बोर्डचा दावा.
लातूर जिल्ह्यातील तळेगावातील ७५ टक्के जमिनीवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. गावातील १०३ शेतकऱ्यांचा ३०० एकर जमिनीचा यात समावेश आहे. जमिनी परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवल्या आहेत.यामुळे आता अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये भीतीचं वातावरण परसलं आहे. तळेगावातील शेतकऱ्यांनी आता महाराष्ट्र सरकारकडे याबाबत न्याय मागितला आहे. दुसरीकडे, मालेगावचे एआयएमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल कासमी यांनी जर जमीन वक्फ बोर्डाची असेल तर ती परत करावी लागेल असं म्हटलं आहे.लातूर जिल्ह्याच्या तळेगावातील ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे.
वक्फ बोर्डाची संपत्ती इस्लामी कायद्यानुसार केवळ धार्मिक आणि लोकोपयोगी कामासाठी वापरली जाऊ शकते. त्यातून वक्फ बोर्डाने लातूरमधील १०३ शेतकऱ्यांना नोटीस पाठवली आहे. या जमीन वादात सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य वक्फ प्राधिकरणाकडे सुनावणीस गेले आहे. त्यावर बोलताना शेतकऱ्यांकडे जर कागदपत्रे असतील तर अशा
१०० नोटीस आल्या तरी काय फरक पडणार आहे असा सवाल केला आहे.शेतकरी जर जमीन त्यांची आहे असा दावा करत असतील तर आणि त्यांच्याकडे पुरावे, कागदपत्रे असतील तर वक्फ बोर्डाने १०० नोटीस पाठवल्या तरी काय फरक पडणार आहे. पण जर ती जागा वक्फ बोर्डाची आहे आणि शेतकरी तिथे शेती करत असतील तर वक्फ बोर्डाला जमीन परत घेण्यासाठी अधिकार आहे. याच्यात कोणती चुकीची गोष्ट आहे,” असा सवाल मुफ्ती इस्माईल कासमी यांनी केला आहे.