
महाराष्ट्र शासन 5000 कंत्राटी कर्मचारी भरणार; सरकारने खाजगी कंपनीला दिले 110 कोटींचे कंत्राट
महाराष्ट्र सरकार 5000 कंत्राटी कर्मचारी भरणार आहे. यासाठी सरकारने खाजगी कंपनीला 110 कोटींचे कंत्राट दिले आहे. महाराष्ट्रातील 27 शासकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कुशल, अकुशल व अर्धकुशल कर्मचारी यांची बाह्य यंत्रणेद्वारे भरती केली जाणार आहे.वैद्यकीय विभागामार्फत राज्यातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये 5000 कंत्राटी कर्मचारी भरले जाणार आहेत. सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला राज्य सरकारकडून हे कंत्राट देण्यात आलंय. त्यासाठी वर्षाला सुमारे 110 कोटी रुपये खर्च येणार आहे. महाराष्ट्रातील 27 शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये कुशल, अकुशल व अर्धकुशल कर्मचारी बाह्य यंत्रणेद्वारे भरले जाणार आहेत.
www.konkantoday.com