
रत्नागिरी देवरुख मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटरसायकल स्वार तरुणाचा मृत्यू.
संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी येथील अमीर मुकादम (वय 35) या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत शुक्रवारी मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकावर देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमीर मुकादम याचा तुळसणी येथे पोल्ट्री व्यवसाय आहे.कामानिमित्त शुक्रवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून तुळसणीहून बावनदीच्या दिशेने जात होता. देवरुख रत्नागिरी मार्गावरील वायंगणे फाटा येथे अज्ञात वाहनाने अमीर याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीसह अमीर रस्त्यावर कोसळला. हा प्रकार पाहताच भयभीत झालेल्या वाहन चालकाने तेथून धूम ठोकली.या मार्गावरून ये-जा करणार्या स्थानिकांना दुचाकी व अमीर पडलेला दिसून आला. त्याला तत्काळ उपचारासाठी रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून अमीर याला मृत घोषित केले