थकबाकीदार दाद देत नसल्याने वीज ग्राहकांविरोधात महावितरण आक्रमक.
महावितरणच्या वीज ग्राहकांकडून थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने ग्राहकांना समज, नोटीसा देवूनही ग्राहक थकबाकी भरण्यास दाद देत नसल्याने कंपनी आता ऍक्शन मोडवर आहे. पण थकबाकीदारांमुळे वीज जोडणी तोडलेल्या ग्राहकांसाठी महावितरण कंपनीने अभय योजनेला ग्राहकांच्या मागणीनुसार मुदतवाढ दिली आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत याला मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सव्वासातशे वीजग्राहकांना त्याचा फायदा घेता येणार आहे.www.konkantoday.com