
आंजर्ले खाडीतील गाळ काढण्याचे काम पूर्णत्वाला येणार
बर्याच वर्षापासून दापोली तालुक्यातील कोळी बांधवांची आंजर्ले खाडीचा गाळ काढण्याची मागणी आता पूर्णत्वास येणार आहे. आंजर्ले खाडीतील गाळ काढणारी यंत्रणा खाडीत दाखल झाली आहे. यामुळे आंजर्ले खाडी आता मोकळा श्वास घेणार आहे.दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडी ही एक महत्वाची खाडी आहे. मासेमारी बंदीच्या काळात याच खाडीत येथील कोळी बांधव आपल्या नौका नांगरून ठेवतात. शिवाय आंजर्ले पंचक्रोशीतील अनेक नौका या खाडीत दररोज ये-जा करत असतात. मात्र आंजर्ले खाडीचे मुख गाळाने भरले असल्याने अनेक जड नौका या गाळात फसतात व त्यांचे नुकसान होते.www.konkantoday.com