राजापूर-कोंड तिवरे बोगद्यानजिक खेडच्या तरूणाचा रेल्वेतून पडून मृत्यू.

खेड तालुक्यातील बोरज येथील योगेश बाळाराम आग्रे या तरूणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर-कोंड तिवरे बोगद्यानजिक घडली. तो नोकरीसंदर्भातील मुलाखत देण्यासाठी रेल्वेने गेला होता. त्याचा मृतदेह राजापूर-कोंड तिवरे बोगद्यानजिक रेल्वे कर्मचार्‍यांच्या गस्तीदरम्यान आढळला होता. त्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button