उपमुख्यमंत्री पदावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट.
राज्याला पुन्हा दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. पण आता याच शपथविधी सोहळ्यावरून आणि उपमुख्यमंत्री पदावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘ एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागणार होती.. त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली होती. माझ्याकडे पक्की माहिती आहे, त्याशिवाय मी बोलत नाही. सरकारमध्ये आमची माणसं आहेत ‘ असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. सरकारमध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये आमचे हितचिंक असतात. त्यांच्या पक्षातसुद्धा, गटातसुद्धा हितचिंतक आहेत असेही राऊत म्हणाले. दाबदबावाचा अडेलतट्टूपणा असाच कायम राहिला असता, तर त्यांच्याशिवाय पुढे जा, असं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने कळवलं होतं, असा दावाही राऊत यांनी केला.