जिल्ह्यातील चिरेखाण कामगारांची प्रशासनाकडे नोंदच नाही?
रत्नागिरी जिल्ह्यात व खेडसह दापोली तालुक्यात चिरेखाणी व्यवसाय जोमात सुरू आहे. या चिरेखाणीवर काम करण्यासाठी आलेल्या कामगारांची प्रशासन दरबारी नोंदच नसल्याची बाब समोर आली आहे. चिरेखाण मालकांनी कामगार नेमके कुठून आणले, कुठून आले याची शासन दरबारी नोंदच नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेवून चिरेखाणीवर काम करणार्या कामगारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.www.konkantoday.com