सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदारांच्या केंद्रीय समितीतील सदस्यांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदारांच्या केंद्रीय समितीतील अध्यक्ष गिरीश बापट, खासदार विनायक राऊत यांच्यासह अन्य खासदारांनी काल दुपारी येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट देत पाहणी केली. यावेळी शिवराजेश्वर मंदिरात जात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले.
मिनी पार्लमेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदारांच्या 30 सदस्यांच्या केंद्रीय समितीने आज चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. त्यानंतर या समितीतील अध्यक्ष बापट, खासदार राऊत, खासदार जुगल किशोर शर्मा, खासदार सुदर्शन भगत यांनी येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली.
www.konkantoday.com