मनसे नेते अविनाश जाधव यांचा राजीनामा मागे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दिला. परंतु, राज ठाकरे यांनी तो स्वीकारला नाही. अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीची सविस्तर माहिती अविनाश जाधव यांनी दिली.ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ठाणे आणि पालघर येथे मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. याची नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला होता. मनसे पक्षाचे नेतेपद, नाविक सेनेचे अध्यक्षपद आहे आणि तिसरे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे अध्यक्षपद आहे. यातील फक्त ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पक्षाचा नेता मी होतोच. राजीनामा दिल्यावर राज ठाकरे यांनी बोलावले होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी तुझीच आहे. तूच या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायचे आहे, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले.
आतापर्यंत राज ठाकरे यांनी जे आदेश दिले, त्याचे पालन केले आहे आणि आता आयुष्यात पुढेही राज ठाकरे यांनी दिलेल्या सर्व आदेशाचे पालन करणार आहे. राजीनामा वगैरे असे काही नसते. काम करत राहायचे असते. यश मिळायचे असेल, तेव्हा मिळेल, असे राज ठाकरे यांनी मला सांगितले. राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून पुन्हा एकदा ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यात मनसे पुन्हा एकदा वाढवणार, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.