
मंदिरे लुटणारी टोळी सावंतवाडीतून गजाआड
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील बहिंदेव मंदिर हनुमान मंदिरामध्ये झालेल्या चोरीचा तपास करीत असताना खोपोली पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथून आंतरराज्य टोळीतील चौघांना अटक केली आहे. या चोरट्यांनी कोकणासह पुणे, गोव्यातील मंदिरातून चोरी केल्याचे चौकशीत उघड झाल्याची माहिती रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे कोकणसह गोव्यामध्ये यापूर्वी झालेल्या चोर्यांचा छडा लागणार आहे.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये अनेक पुरातन मंदिरे आहेत. अशा मंदिरातील मूर्ती, सोन्या-चांदीचे दागिने चोरीच्या घटना सतत घडत असतात.www.konkantoday.com