रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुसर्या वर्षाला सुरूवात.
रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुसर्या वर्षासाठी १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पहिल्या आणि दुसर्या वर्षासाठी महाविद्यालयात शैक्षणिक वर्षाला आता सुरूवात झाली आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाच्या दोन इमारती पूर्ण झाल्या असून पहिल्या वर्षाच्या नवीन विद्यार्थ्यांनी या वसतीगृहात राहण्यास सुरूवात केलेली आहे. लवकरच उर्वरित इमारतीही पूर्ण होतील आणि सर्वच विद्यार्थ्यांची सोय या वसतीगृहात करण्यात येईल असे मत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी बोलताना सांगितले.
रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता पहिल्या आणि दुसर्या वर्गासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाला सुरूवात झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची समस्या होती. मात्र गेल्यावर्षी शहराच्या अध्यापक महाविद्यालयातील वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी सोय करण्यात आली होती. मात्र आता नवीन वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता महाविद्यालयासमोरच वसतीगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. www.konkantoday.com