मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ येथे ट्रॅव्हल व डंपर अपघातात तीन जण जखमी.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ येथे गोव्याच्या दिशेहून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅव्हल गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन डंपरला जोराची धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हल चालक, ट्रॅव्हलमधील दोघे असे तिघेजण जखमी झाले. तिहेरी अपघातात तिन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास झाला.पोलिसांनी दिलेली माहिती, डंपर तुरळ येथे जात असताना चालकाने वळण्यासाठी इंडिकेटर दिला होता.
मात्र गोव्याकडून भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने डंपरच्या पाठीमागील हौद्याला घासत जाऊन केबिनला जोरदार धडक दिली. नंतर रस्ता सोडून खाली जात रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी उभ्या असलेल्या दुसऱ्या डंपरला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही डंपरसह ट्रॅव्हल्सचे नुकसान झाले आहे. अपघातात ट्रॅव्हल्स चालक लक्ष्मण भिवा कळचावकर (रा. शिरोडा, मु. वेंगुर्ला, सिंधुदुर्ग), संतोष श्रीधर जाधव (रा. मानखुर्द,मुंबई), शंभू रंजन दालपती (रा. परेल) हे जखमी झाले आहेत.