
राजापूर तालुक्यातील हसोळतर्फे सौंदळमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांच्यात घबराट
राजापूर तालुक्यातील हसोळतर्फे सौंदळ येथे पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संचार चालू असून नुकतेच अशोक लाड यांची पाडी मारल्याची घटना घडली. यामुळे बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.यापूर्वीही गावातील परवडे यांच्या शेळ्या, रोग्ये यांची पाडी मारली होती. यावेळी वनविभागाकडे तक्रार देण्यात आली होती. मात्र वन विभागाने सरकारी देखावा केला. मात्र पुढे काहीच कारवाई केली नाही. काहीवेळा दिवसा दर्शन होत आहे तर रात्रीच्यावेळी चक्क कुत्रे व मांजरे पकडण्यासाठी ग्रामस्थांच्या अंगणवामध्ये फिरत आहे. तर वाहनधारकांनाही रात्रीच्यावेळी रस्त्यावर त्याचे दर्शन घडत आहे. आतापर्यंत बिबट्याने तीन शेतकर्यांचे मोठेनुकसान केले आहे. www.konkantoday.com