महायुतीच्या भवितव्याच्या दृष्टीने ती गोष्ट चुकीची -ऍड. बाबा परूळेकर.
विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष भाजपच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी महायुतीचे काम केले परंतु काही लोकांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचे काम करून अयोग्य वर्तन केले. अशा लोकांना पक्षाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर मानाचे स्थान मिळाले. ही बाब गैर आहे. महायुतीच्या भवितव्याच्या दृष्टीने ती चुकीची आहे. असे विधान शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी केल्यानंतर भाजपच्या बुजुर्ग नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सामंत म्हणतात तशी गोष्ट असेल तर त्याची गंभीर दखल घेतील. अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड. बाबासाहेब परूळेकर यांनी दिली.www.konkantoday.com