खेडच्या सुपुत्र रूद्रांश शेठ याचा अमेरिकेत डंका.
अमेरिकेतील माऊंट प्रॉस्पेक्ट एलिमेंटरी स्कूलमध्ये धडे गिरवणार्या व खेड शहरातील सुपुत्र असलेल्या रूद्रांश समीर शेठ याने अमेरिकेतील न्यू जर्सी ब्रोकडाले कम्युनिटी महाविद्यालयात झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय बुद्धीबळ स्पर्धेत रेमंड ओयांग या सहकार्यासोबत तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत अमेरिकेतील ४ जिल्ह्यांतून ६५० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.अमेरिकेतून न्यू जर्सी शहरात आयोजित आंतरशालेय राज्यस्तरीय चॅम्पियनशीप बुद्धीबळ स्पर्धेत रूद्रांश याने पाचव्या श्रेणीतील ७७ स्पर्धकांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करत यश प्राप्त केले.www.konkantoday.com