एलईडी वापरून मासेमारी करणाऱ्या दोन मच्छिमार नौका पकडण्यात मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाला यश.
दाभोळ- हर्णे समुद्रात एलईडी वापरून मासेमारी करणाऱ्या दोन मच्छिमार नौका पकडण्यात मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाला यश आले आहे.दाभोळ- हर्णे समुद्रात 20 वाव पाण्यात रायगड व रत्नागिरीतील एकूण दोन नौका राजश्री आयएनडी-एमएच-4-एमएम- 3795 व भाविका आयएनडी -एमएच -3-एमएम-3418 एलईडी साहित्य वापरून मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आल्या नंतर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष संयुक्त गस्त नियोजित करून गस्ती दरम्यान परवाना अधिकारी रत्नागिरी चिन्मय जोशी, परवाना अधिकारी साखरी नाटे पार्थ तावडे आणि गुहागर परवाना अधिकारी स्वप्निल चव्हाण व सुरक्षा रक्षक यांनी कारवाई केली.