
चिपळूण नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी तर्फेरमेशभाई कदम यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला
चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी राजकीय समीकरणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी तयार केली आहे.
या आघाडीच्या वतीने माजी आमदार आणि माजी नगराध्यक्ष रमेशभाई कदम यांनी आज नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अधिकृतपणे घोषित करण्यात आलेला नसला तरी रमेशभाई कदम हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, असे राजकीय वर्तुळात ठामपणे सांगितले जात आहे.
अर्ज दाखल करण्याच्या वेळी आमदार भास्करशेठ जाधव स्वतः उपस्थित राहून कदम यांना पाठिंबा दर्शविला. त्यांच्या उपस्थितीमुळे आघाडीचा उमेदवार निश्चित झाल्याचे संकेत मिळाले असून, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या आघाडीमुळे चिपळूण नगर परिषद निवडणुकीत भाजप-शिंदे गटासमोर कठीण लढत उभी राहणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे लियाकत शहा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राजू देवळेकर यांनीही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.




