नौदलाकडून राईड ऑफ मार्कर्स बाईक रॅली३ रोजी दापोलीत तर ५ ला रत्नागिरीत
रत्नागिरी दि.२9, :- भारतीय नौदलाकडून राईड ऑफ मार्कर्स ही बाईक रॅली २ ते ११ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. शाळा व तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच नागरिकांसोबत संवाद साधणे. राष्ट्र उभारणीमधील भारतीय नौदलाची भूमिका आणि जबाबदाऱ्या, करिअरचे संभाव्य पर्याय याबाबत जागरुकता निर्माण करणे याकरिता नौदलाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचा प्रवास आठ शहरातून १ हजार ५८० कि.मी. होणार आहे. २ डिसेंबर रोजी मुंबई ते दापोली असा प्रवास करुन ३ डिसेंबर रोजी दापोली येथे मुक्काम आहे. ४ डिसेंबर रोजी दापोली ते रत्नागिरी असा प्रवास करुन ५ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे मुक्काम आहे. ६ डिसेंबर रोजी रत्नागिरी ते गोवा असा रॅलीचा मार्ग आहे.
भारतीय नौदलातील महिला अधिकारी व अग्नीवीर यांच्यासह १८ मोटरसायकल चालक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत, असे कमांडर, क्षेत्रीय सिविल सेना मेलजोल अधिकारी कृते ध्वज अधिकारी कमान अभिषेक कारभारी यांनी कळविले आहे.