
रेल्वेस्थानक संगमेश्वर येथे चिपळूण व निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुप च्या वतीने बुधवार दिनांक २६ जानेवारी पासून बेमुदत उपोषण सुरू
रेल्वेस्थानक संगमेश्वर येथे निसर्गरम्य चिपळूण व निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुप च्या वतीने बुधवार दिनांक २६ जानेवारी पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
नेत्रावती व मत्स्यगंधा एक्सप्रेस ला संगमेश्वर रेल्वे स्थानकात थांबा मिळावा यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
उपोषनाला संदेश झिमन व गणपत दाभोळकर बसले आहेत. संगमेश्वर रेल्वे स्थानकात थांबणाऱ्या रेल्वे गाड्या अवेळी थांबतात. रात्रीच्या वेळी प्रवाशांना गावापर्यंत प्रवास करताना नाहक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मत्स्यगंधा व नेत्रावती या रेल्वे गाड्या सकाळच्या सत्रात धावतात यामुळे प्रवाशांना प्रवासाच्या दृष्टीने गाड्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. या एक्सप्रेसला संगमेश्वर रेल्वे स्थानकात थांबा मिळाल्यास प्रवाशांना सोयीचे होणार आहेप्रवाशांच्या हितासाठी निसर्गरम्य चिपळूण व निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या वतीने गेली दोन वर्ष लढा सुरू आहे. रेल्वे प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात येत आहे. आंदोलनाचा इशारा दिल्यास केवळ रेल्वे प्रशासनाकडून आश्वासने दिली जातात. यामुळेच निसर्गरम्य चिपळून व निसर्गरम्य संगमेश्वर फेस ग्रुप च्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी २६ जानेवारी रोजी बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यानुसार बुधवारी प्रत्यक्षात सकाळी १० वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात झाली आहे. या उपोषणाला राजकीय संघटना, सामाजिक संघटना आदींनी पाठिंबा दिला आहे.
www.konkantoday.com