
रत्नागिरी शहरात रात्री हॉटेल बंदच्या सक्तीने व्यावसायिकांच्यात नाराजी.
रत्नागिरी शहरातील रात्री ११ वाजता बंद करण्यास पोलिसांकडून सक्ती करण्यात येत असल्याने व्यापारी वर्गात नाराजी दिसून येत आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याने अशा प्रकारे हॉटेल बंद करण्यात येवू नयेत, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
काही पर्यटक हे जिल्ह्याबाहेरून रत्नागिरीत येत असतात. त्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये थोडी शिथिलता देण्यात यावी अशी मागणी होत आहे.एप्रिल, मे व जून महिन्याचे काही दिवस रत्नागिरीत मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे त्यांना रात्रीच्या वेळी जेवण उपलब्ध होणे आवश्यक असते. काही पर्यटक हे रात्रीचे रत्नागिरीत दाखल होतात. त्यांचा विचार करता काही प्रमाणात व्यावसायिकांना हॉटेल सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.www.konkantoday.com