खेड बसस्थानकात प्रवासी पित आहेत उघड्या पिंपातील पाणी

. खेड बसस्थानक नानाविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उघड्यावरील पिंपात करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एसटी प्रशासन प्रवाशांच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोप केला जात आहे. पिण्याच्या पाण्याचा थांगपत्ताच नसल्याने पाण्याअभावी प्रवाशांची हेळसांड होत आहे. वेळप्रसंगी प्रवाशांना विकतचे पाणी पिऊन तहान शमवावी लागत आहे.येथील बसस्थानकात एसटी प्रशासन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात अपयशी ठरल्यानंतर स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत पाणपोईची व्यवस्था केली होती या पाणपोईमुळे प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला होता. मात्र पाणपोईच्या देखभाल दुरूस्तीकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे ही सुविधा बंद असल्याची बाब समोर आली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button