चिपळुणात महिलेची ऑनलाईन २५ हजाराची फसवणूक.
पंचवीस हजार रुपये खात्यामधून ट्रान्सफर करायला लावून त्याची रोख रक्कम न देता यातून फसवणूक झाल्याचा प्रकार चिपळूण तालुक्यातील कापसाळ येथील आर्यन झेरॉक्स सेंटर येथे गेल्या महिन्यात घडला आहे. याप्रकरणी सोमवारी अज्ञाताविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद एका महिलेने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती कापसाळ येथील आर्यन झेरॉक्स सेंटर येथे आली. या झेरॉक्स सेंटरमध्ये असलेल्या त्या महिलेस त्या व्यक्तीने कोटक महिंद्रा खात्यात २५ हजार ट्रान्सफर करायला लावले. मात्र त्याची रोख रक्कम त्या महिलेकडे जमा न करता ती व्यक्ती दुकानातून बाहेर पडत दुचाकीने निघून गेली. हा प्रकार त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर या प्रकरणी महिलेने चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्या अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com