
शृंगारतळी येथे स्टार इलेक्ट्रीकल्स आणि मनी ट्रान्सफर या दुकानाचे मालकाची फसवणूक.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे स्टार इलेक्ट्रीकल्स आणि मनी ट्रान्सफर या दुकानाचे मालक आजिम साल्हे यांची 25 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. शृंगारतळी येथे आजिम दाऊद साल्हे सन 2014 पासून दुकानात त्यांनी अधिकृत बँकिंग पॉईंन्ट सुरु केला.या बँकिंग पाँईंन्टद्वारे ग्राहकांचे पैसे त्यांच्या खात्यातून दुसर्याच्या खात्यात जमा करुन देण्याची सेवा दिली जाते. त्यांच्या दुकानात आलेल्या ग्राहकाने त्यांना 25 हजार रुपयांना फसविले.याबाबत पोलीस ठाण्यात त्यांनी 24 नोव्हेबर रोजी तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे 19 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8.45 च्या सुमारास दुचाकीवरुन गणेश उगलमुगले दुकानात आले. त्यांनी त्यांच्याकडील रोख रु. 25 हजार ओव्हरसीज बँक खाते 320001000002987 या खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यावर वैयक्तिक खाते असलेल्या कॅनरा बँकेतून हे पैसे ट्रान्सफर करण्याचे निश्चित केले.
मनी ट्रान्सफरसाठी गणेश उगलमुगले यांना मोबाईल क्रमांक विचारला त्यावेळी त्यांनी 9112671644 आणि 8983489409 हे दोन क्रमांक दिले. गणेश उगलमुगले यांनी सांगितलेल्या ओव्हरसीज बँकेत माझ्या कॅनरा बँकेच्या खात्यातून सुरवातील 1 रु आणि नंतर 24 हजार 999 रु. ट्रान्सफर केले. आता गणेश उगलमुगले यांच्याकडे 25 हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी दुचाकीला लावलेल्या पिशवीतील पैसे आणून देतो असे सांगुन गणेश दुचाकीजवळ गेला. मात्र त्याचवेळी दुचाकी सुरु करुन गुहागरच्या दिशेने गणेशने पलायन केले. मात्र त्याचा पाठलाग केला असता तो सापडला नाही. ही तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली