
खेडशीत दुचाकींमध्ये धडक, एकाविरूद्ध गुन्हा
शहरानजिक असलेल्या खेडशी नाका येथे दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत दोघेजण जखमी झाले. या प्रकरणी हयगयीने वाहन चालवल्याचा ठपका ठेवत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी दुचाकीस्वार महेश अनंत सावंत (३६, रा. खेडशी बौद्धवाडी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सावंत हे आपली दुचाकी (एमएच ०८ एजे ७६९९) घेवून घेडशी नाका ते खेडशी गाव असे जात होते. खेडशी नाका येथे समोरून येणारी दुचाकी (एमएच ०८ एयु ९३८७) हिला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील गिरीष विलास मुळ्ये (३८, रा. रहाटाघर रत्नागिरी व महेश सावंत हे जखमी झाले होते.
www.konkantoday.com