रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी उनाड गुरांच्या गळ्यात रेडियम बेल्ट.
रस्ते अपघाताच्या अनेक घटना घडत असताना यातील अनेक अपघात रात्रीच्या वेळी होतात. आणि त्यातही वाहनचालकांना रात्रीच्या अंधारात रस्त्यातील गुरे न दिसल्याने त्यांना धडक बसून होणार्या दुर्घटनांची संख्याही वाढली आहे. त्यातून माणसांबरोबरच प्राण्यांचे मृत्यू होत असतात. हे टाळण्यासाठी उनाड गुरांच्या गळ्यात रेडीयम बेल्ट लावल्यास रात्रीही ते सहजपणे दिसू शकतात. त्यासाठी रत्नागिरीत एका दुकानात कामाला असलेल्या सहा तरूणांनी गो सेवा महासेवा मानून त्या मोकाट गुरांच्या गळ्यात रेडियम बेल्ट लावण्याचे व्रत हाती घेतले आहे.www.konkantoday.com