
अवकाळी पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनांवर परिणाम, भाज्यांचे दर कडाडले.
अवकाळी पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे भाज्यांवर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यात आता फोडणीतला लसूण महाग झाला आहे. अगदी नॉनव्हेजपासून ते तडका डाळीला देण्यासाठी लसणीचा वापर होत असतो. मात्र दर भडकल्याने लसणाच्या फोडणीसाठी गृहिणी हात आखडता घेत आहेत.तडक्यातून किंवा फोडणीतून लसूण गायब होणार आहे. याचे कारण म्हणजे लसणीचे दर कडाडले आहेत. आवक कमी झाल्याने लसूण, भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर, घेवण्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. बर्याचशा भाज्या आणि लसणीची आवक ही परराज्यातून करण्यात आली आहे. त्यामुळे साजिकच त्यांचे दर जास्त आहेत.www.konkantoday.com