सीएसएमटी मुंबई येथील फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकण मार्गावरील तीन एक्सप्रेस ठाणे-दादरपर्यंत

_सीएसएमटी मुंबई येथील फलाट क्रमांक ×१०, ११, १२ व १३ च्या लांबीच्या विस्तारीकरण कामामुळे कोकण मार्गावरून धावणार्‍या तीन रेल्वेगाड्या ३० ऑगस्टपर्यंत ठाणे-दादर स्थानकापर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. या गाड्यांचा प्रवास ठाणे व दादर स्थानकात संपणार आहे. मंगळूर-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस ३० ऑगस्टपर्यंत ठाणे स्थानकापर्यंत धावेल. मडगाव-सीएसएमटी मुंबई तेजस एक्सप्रेसचा प्रवास दादर स्थानकापर्यंत संपेल. मडगांव-सीएसएमटी मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसही ३० ऑगस्टपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button