मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रात्री 12 वाजून 53 मिनिटांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्री 12 वाजून 53 मिनिटांनी आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीट) अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना आपल्या घराबाहेर न जमण्याचं आवाहन केलं आहे. “महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे.

तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो,” असं मुख्यमंत्री शिंदेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.तसेच, “माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील,” असंही मुख्यमंत्र्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button