जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह व जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मतदान करून बजावला मतदानाचा हक्क.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान सुरू झाले असून रत्नागिरी जिल्ह्यातही मतदानाला सुरुवात झाली आहे रत्नागिरीचेजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पत्नी अंकिता यांच्यासह येथील रा भा शिर्के हायस्कूल मतदान केंद्रावर आज सकाळी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला मतदारानी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे