कोकण रेल्वेमार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग वाढला.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या गाड्यांचा कमाल वेग ताशी १२० किलोमीटर प्रतितास करण्यात आला आहे. रोहा ते ठोकूर या ७०० किलोमीटरच्या मार्गावर ताशी १२० किलोमीटरची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे ४५ गाड्यांचा वेग वाढणार आहे. यापूर्वी केवळ तेजस एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस आणि वंदे भारत या गाड्यांची कमाल अनुज्ञेय वेगमर्यादा १२० कि.मी. प्रतीतास होती.
इतर गाड्यांची कमाल अनुज्ञेय वेगमर्यादा ११० कि.मी. प्रतीतास होती. ती आता वाढवण्यात आली आहे. रेल्वे गाड्यांची वेगमर्यादा वाढवल्याने प्रवाशांच्या वेळेत बचत होणार असून प्रवासही सुखकर होणार आहे. www.konkantoday.com