
रत्नागिरी शहरानजिकच्या आरटीओ कार्यालयाजवळील रेल्वे पुलावर तरूणाची आत्महत्या.
रत्नागिरी शहरानजिकच्या आरटीओ कार्यालयाजवळील रेल्वे पुलावर तरूणाने भरधाव रेल्वे गाडीसमोर उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ३.४५ ते ४ या कालावधीत घडली. आहे. वासू दौलत कडकपट्टी (२२, रा. कुवारबांव, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना त्या ठिकाणी तरूणाचे शीर धडावेगळे झालेले आढळून आले.
मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती. www.konkantoday.com