
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने भोपाळमधून केली अटक
सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने भोपाळमधून ताब्यात घेत अटक केली आहेमालेगावमधील NDCC बँकेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अद्वय प्रशांत हिरे आणि एकूण 30 जणांविरोधात 30 मार्च 2023 ला रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
अद्वय हिरे यांच्यासह हिरे कुटुंबातील इतर सदस्यांचाही आरोपींच्या यादीत समावेश होता. रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी कर्ज घेण्याकरिता बनावट दस्तऐवज तयार करून बँकेची 7 कोटी 46 लाख रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. अद्वय हिरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी मालेगाव सेशन कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अंतरिम जामिनासाठी हायकोर्टाकडे धाव घेतली होती. मात्र 6 नोव्हेंबर 2023 ला तो अर्ज फेटाळताच स्थानिक गुन्हे शाखेने भोपाळमध्ये त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
www.konkantoday.com