
अपार आयडीचे. जिल्ह्याचे काम ९०.९९ टक्के पूर्ण.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पहिली ते बारावीतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ऑटोमेटेड परमानेंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री (अपार आयडी) तयार केली जात आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ लाख ७ हजार १६६ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ८८ हजार ५०१ विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार केले आहेत.
जिल्ह्याचे काम ९०.९९ टक्के काम पूर्ण झाले आहे.’अपार आयडी’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील सर्व नोंदी डीजिटल लॉकरमध्ये संग्रहित राहणार आहेत. त्यामुळे भविष्यात शैक्षणिक रेकॉर्ड ऑनलाइन सहज उपलब्ध होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा ओळख क्रमांक एकसंध राहणार आहे. शिक्षण विभागाने शंभर टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.