आता मनसे नाही राहिली, गुनसे झाली- उद्धव ठाकरें.
राजन विचारे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ठाण्यात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.गचके खात खात तुमच्यापर्यंत पोहचलो. कुठेही भाषण करायची गरज नाही. मी ठाण्यात आलोय कारण गद्दारीचा केंद्रबिंदू इथे आहे. त्या गद्दाराच्या बुडाला मशाल लावायची आहे. ठाण्याला गद्दारीचा कलंक लागला आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच ठाणे महापालिकेला यांनी भिकेला लावलं आहे.
90 हजार कोटींच्या ठेवी यांच्या कंत्राटदारांनी लुटल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझं नाव नाही घेतलं , आता नाव घेताना थरथरत होते. मागच्या वेळी नकली संतान बोलले, तेव्हा महाराष्ट्राने पेकाटात लाथ मारली, असा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला.आता मनसे नाही गुनसे- उद्धव ठाकरेगुजरातला हे लोक ढोकळा खायला गेले. ठाण्यातली मिसाळ खायची ना…काही लोकांना खूप आवडते मिसळ खायला. मागच्यावेळी बिनशर्ट पाठिंबा दिला. आता इनशर्ट पाठींबा दिला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केली.
तसेच मला विचारतात एक जागा का सोडली नाही?, मी का सोडू, यांना लुटायला सोडायची का?, कोणत्याही लुटणाऱ्या लोकांना जागा सोडणार नाही.. असं विधानही उद्धव ठाकरेंनी माहीम विधानसभेच्या जागेवरुन केला. या ठिकाणी तुम्ही मत आता दुसऱ्यांना दिला तर आता आपलं खरं नाही. आपण गुनसेला मत देणार का?, गुजरात नवनिर्माण सेना…आता मनसे नाही राहिली, गुनसे झाली, असं उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं.