
महसूल विभागाचा मोठा निर्णय, जमिनीची पोटहिस्सा विभागणी मोजणी आता २०० रुपयांमध्ये.
राज्यातील शेतकर्यांच्या जमीन मोजणीबाबत महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शेतजमिनीच्या हिस्सेवाटप मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप नोंदणी अवघ्या २०० रुपयांमध्ये होणार आहे. यापूर्वी १ ते ४ हजार रुपये प्रतिहिस्सा या दराने पोटहिस्सा मोजणी करण्यात येत होती. आता केवळ २०० रुपयांमध्ये पोटहिस्सा मोजणी होणार आहे.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, कारभार लोकाभिमुख होण्यासाठी निर्णय घेण्यात आला. हद्द चतुःसीमा यांची नोंद होऊन भविष्यातील वाद टळता येणार आहेत.www.konkantoday.com