
रांगोळ्यांची सजावट आणि मंदिरावरील ५१ हजार दिव्यांचा झगमगाटाने पंचगंगा परिसर उजळला.
पंचगंगा नदी, आकर्षक भव्य प्रबोधनात्मक रांगोळ्यांची सजावट आणि जोडीला समाधी मंदिरावरील ५१ हजार दिव्यांचा झगमगाट, नयनरम्य विद्युतरोषणाई, आतषबाजीने सप्तरंगांत उजळलेला आसमंत अशा तेजोवलयात पंचगंगेचा काठ आज, शुक्रवारी पहाटे उजळला.त्रिपुरारी पौर्णिमेला जलाशयांसह मंदिरांमध्ये दीप प्रज्वलित करून प्रथेनुसार या दीपावली पर्वाची सांगता झाली.पंचगंगा नदीघाट परिसरात ‘शिवमुद्रा प्रतिष्ठान’तर्फे हा सोहळा पार पडला. पहाटे चार वाजता दीपपूजनाने दीपोत्सवास प्रारंभ झाला.