
विलास रहाटेने पिंपळ पानावर साकारली डॉ. आंबेडकरांची रांगोळी
देवरूखचा सुपुत्र रहाटे हा नेहमीच कलेच्या माध्यमातून चर्चेत आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपली कला पेश करत आहे. पिंपळाच्या पानावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी साकारत कलेच्या माध्यमातून अभिवादन केले आहे.विलास रहाटे याने रांगोळी, कोलाज, मातीकामाच्या माध्यमातून आपल्या कलेची छाप सर्वत्र उमटवली आहे. तालुका ते राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करत देवरूखचे नाव रोशन केले आहे. तीन बाय तीन सेंटीमीटर आकाराची छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी साकारली होती. सर्वात लहान असलेल्या रांगोळीची थेट गिनीज बुकात नोंद करण्यात आली आहे. यानंतर सुपारीवर श्री स्वामी समर्थ व तुणशीचे पानावर विठ्ठलाचे चित्र रेखाटून देवरूखवासियांची वाहवा मिळवली होती. www.konkantoday.com