
खेड तालुक्यातील साखरोलीत इलेक्ट्रीक टू व्हिलर गोदामाला आग.
खेड तालुक्यातील साखरोरी येथील पेट्रोलपंपाशेजारी असलेल्या ड्रीम लाईन मोटर्स, इलेक्ट्रीक टू व्हिलर गोडावूनला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. येथील नगर परिषदेच्या अग्निशामक दलास कळविल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहचून कर्मचार्यांनी अवघ्या तासातच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.या ठिकाणी आग लागल्याची खबर मिळताच अग्निशामक केंद्रातील फायरमन दिपक देवळेकर, श्याम देवळेकर, सहाय्यक फायरमन प्रणय यसाळ, जयेश पवार, प्रणव घाग, वाहनचालक विद्याधन पवार, गजानन जाधव आदींनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत गोदामामधील साहित्याचे नुकसान झाले आहे. www.konkantoday.com