सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला धक्का, माजी खासदार

ब्रिगेडियर सुधीर सावंत ठाकरे सेनेत प्रवेश करणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सावंतवाडी येथील जाहीर सभेत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.ब्रिगेडियर सुधीर सावंत हे काँग्रेसमधून खासदार होते. त्यांनतर त्यांनी स्वतःचा स्वराज पक्ष काढला होता. नंतर ते आम आदमी पार्टीत सामील झाले होते. शिवसेना शिंदे गटाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी तिथे प्रवेश केला होता. आज ते शिवसेना शिंदे गटामधून ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा आहेत. यात कुडाळ आणि सावंतवाडी या दोन जागा शिवसेना शिंदे गट आणि कणकवलीची जागा भाजपाकडे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button